उस्मानाबाद-उमरगा / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला असून हा रुग्ण उमरगा येथील रहिवासी असून तो ४२ वर्षीय आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील पाठविलेल्या स्वब नमुने पैकी ५६ अहवाल प्राप्त झाले असून त्यांच्यापैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे तर इतर ५५ जणांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. नेगेटिव्ह रिपोर्ट आल्याने उस्मानाबाद जिल्ह्याला दिलासा मिळाला असून हे सर्व जण कोरोना रुग्ण सापडलेल्या उमरगा व तुळजापूर तालुक्यातील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी ४४ जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. कोरोना बाधित असलेल्या या रुग्णावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी सापडलेले २ कोरोना रुग्ण हे उमरगा तालुक्यातील बलसुर व लोहारा तालुक्यातील धानोरी येथील असून त्यात आणखी एकाची भर पडली आहे.हा रुग्ण उमरगा शहरातील रहिवासी असल्याने खळबळ उडाली असून उमरगा शहरात तात्काळ सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.उमरगा शहरातील सर्व संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत त्यांचे नुमने घेण्यात येणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ५५ नमुने निगेटिव्ह आले असून त्यात उमरगा तालुक्यातील २५, तुळजापूर १७, उस्मानाबाद व परांडा प्रत्येकी ६ तर कळंब येथील २ जणांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी रविवारी जनता कर्फ्यू  लागू केला होता. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
 
Top