उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील सर्व नागरिकांना उस्मानाबाद न.प. कडून आवाहन करण्यात   की, नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेचे कर्मचारी घरोघरी जाऊन बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करत आहे, परंतु काही भागात नगर पालिकेचे कर्मचारी माहिती संकलित करण्यासाठी गेले असता त्यांना खरी माहिती सांगितली जात नाही असे लक्षात येत आहे .
त्यामुळे तरी सर्व नागरिकांनी  आपण खरी माहिती नगर पालिकेच्या कर्मचा-यांना न दिल्यास तुम्ही स्वतःला व आपल्या कुटुंबियांना धोक्यात घालून समाजाचे आणि स्वतःचे नुकसान करताय हे लक्षात घेत नगर पालिकेच्या कर्मचा-यांना योग्य ती खरी माहिती देऊन प्रशासनाला पुढील कार्यवाही साठी सहकार्य कराव असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top