उस्मानाबाद/प्रतिनिधी-
16 दिवसासाठी पुर्ण देश भरामध्ये संचारबंदी लागू असल्याने कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही .  त्यामुळे उस्मानाबाद शहरातील सर्व नागरिकांना आता  दैनंदिन जीवनात लागणा-या अत्यावश्यक वस्तू  घरपोच पुरवण्यासाठी उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने सर्व  भाजी , किराणा, दुध ,फळे यांसोबत मटन व चिकन  विक्रेत्यांची ही यादी फोन नंबरसह तयार केली आहे व या सर्व व्यापा-यांना पोलीस प्रशासन आपल्या वस्तू पोहच करताना अडवू नये म्हणुन  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या मान्यतेने नगर पालिकेचे ओळखपत्र देण्यात येत आहेत तरी  सदर यादी मधील व्यापा-यांशी फोनद्वारे संपर्क साधुन आपल्याला लागणा-या जीवनावश्यक वस्तूंची मागणी आपण  घरबसल्या करता येणार आहे
त्यामुळे उस्मानाबाद शहरातील सर्व नागरिकांना न.प. च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की,  कोणत्याही नागरिकांनी  घराबाहेर न पडता नगर परिषदने करून दिलेल्या सोईचा लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.  सदर यादी ही मटन व चिकन विक्रेत्यांची असुन अशाच   प्रकारच्या भाजीपाला , दुध व फळे विक्रेत्यांच्या तीन याद्या  नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी  फेसबुक पेज वर अपडेट केलेल्या आहेत. 🙏राहिलेल्या सर्व विक्रेत्यांना व व्यापा-यांना ओळखपत्र देण्यासाठी नगर पालिकेलाही  मर्यादा असल्याने  यानंतर आपली नावे व मोबाईल नंबर पाठवू नयेत, विनंती करण्यात करण्यात आली आहे.
 
Top