तामलवाडी/ प्रतिनिधी-
 कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला असून या रोगावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘मीच माझा रक्षक’ समजून प्रत्येकानी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन जेष्ठ विविज्ञ गजानन चौगले यांनी केलं आहे. सर्वांनी  एकमेकांपासून दोन फुटांचे अंतर ठेवावे, आपले हात वारंवार साबणाने अथवा डेटॉलने स्वच्छ धुवावे, शिंकतांना किंवा खोकताना नाका-तोंडावर रुमाल घ्यावा, गर्दीत जाणे शक्यतो टाळावे, अत्यावश्यक काम नसल्यास आपल्याच घरात राहावे. या चार - पाच बाबींचे काटेकोरपणे पालन करुन प्रत्येक नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडून  दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि आपण स्वतः व आपल्या कुटुंबास आणि पर्यायाने आपल्या समाजास या महामारी रोगापासून वाचवावे आणि या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रत्येकाने आपापल्या घरातच बसून राहावे, असे आवाहनही  अॅड.गजानन चौगुले यांनी केलं आहे
 
Top