लोहारा/प्रतिनिधी
सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.या विषाणूंचा नायनाट करवयाचा असेल तर स्वतः सज्ज होणे महत्वाचे आहे. कोरोनाला हद्द्पार करावयाचे असेल तर स्वतः मजबूत व खंबीर झाले पाहिजे. कोरोनाचा मुकाबला करण्याकरिता मुंबई मंत्रालयातील खादी ग्रामोद्योग सहसंचालक विद्यासागर हिरमुखे हे सध्या नित्यनियमाने या वयात सुध्दा आपल्या भुसणी ता.उमरगा येथील शेतात भल्या पाहाटे फिरायला जातात व शेतात योगा - प्राणायाम करुन शेततळ्यात पोहण्याचा आनंद घेतात. त्यांच्या या सवयीमुळे शरीर तंदुरुस्त तर राहतेच पण शारीरिक क्षमता वाढून रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. मडथेरपी ट्रिटमेट म्हणजे स्वच्छ काळी चिकन मातीचे पाण्यामध्ये मिसरण तयार करून संपूर्ण शरीराला लेप दिल्यामुळे व अर्धा तास स्वच्छ सुर्य प्रकाशात बसल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्वचारोग मुक्त होते. त्यांच्या या निरोगी राहण्याच्या सवयीचे गावकऱ्यांनी कौतुक करुन हा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त होत आहे.
 
Top