तुळजापूर / प्रतिनधी-
तालुक्यातील नळदुर्ग येथील बसस्थानक समोरील महामार्गावर उभ्या असलेल्या पांढऱ्या स्काँर्फिओ गाडीवरील शासनाने दिलेल्या परवाना वरील क्यु आर कोड ची तपासणी केली असता तो अवैध निघाल्याने सदरील जीपचालकासह तिघांजणांन विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
या बाबतीत अधिक माहीतीअशीकी शनिवार दि11रोजी सांयकाळी साडेसहा वाजता बसस्थानक समोरील रस्त्यावर सपोनि वानखेडे हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांन सह पेट्रोलिंग करताना पांढऱ्या रंगाची स्काँर्पिओ (क्र. MH13CK1739)  ही जीप वरील काचेवर   शासनाने दिलेला पास परवाना असलेली दिसुन आली असता पोलिस तिथे गेले व  जीप पास परवाना चा क्यु आर कोड मोबाईल मधील क्यु आर कोड  स्कँन ध्दारे नमुद पास वरील क्यु आर कोड स्कँन केला असता सदरचा कोड अवैध असल्याचे निदर्शनास आला.
त्यांनतर पोलिसांनी जीप चालक तमीम सोहेब काझी ( रा. नळदुर्ग ) यास सदरचा पास कोठुन मिळवला , असे विचारणा केली असता त्याने सदरचा पास हा सोहेल कदीर कुरैशी व कुनाल प्रभाकर पासमेल व  महेमुद मुजमिल अब्दुल लतीफ शेख   यांच्या मदतीने मोबाईल व वैभवी काँप्युटर टेकनीकल इंन्स्टीयुट नळदुर्ग व महाराष्ट्र दुध डेअरी व मल्टी सर्हीस सेंन्टर नळदुर्ग येथील काँप्युटरचा व प्रिंन्टर्सं चा वापर करुन बनवला असे सांगितल्याने जीप चालक तमीम सोहेब काझी, सोहेल कदीब,कुणाल प्रभाकर पासमेल  या सर्वांना तात्काळ ताब्यात घेवुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top