तुळजापूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात भाविकांची संख्या शून्यावर आली आहे. शिवाय लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे सामूहिक कार्यक्रम बंद असल्याने पालिकेने शहरात दररोजऐवजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने एक महिन्यापूर्वीच तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद केले अाहे. यामुळे शहरात भाविक तसेच पाहुणे मंडळीही येणे बंद झाले आहे. या शिवाय लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे लग्न समारंभासह सर्वच धार्मिक कार्यक्रम, समारंभ, सोहळे बंद असल्याने पाणीसाठा शिल्लक रहात आहे. परिणामी पालिकेने दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उत्तम अमृतराव यांनी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
Top