नळदुर्ग / प्रतिनिधी-
 कोरोनाने जगभर थैमान घातले असून आपल्या देशात, राज्यात देखील संख्या वाढत आहे. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत कोरोना बाधीत रुग्णांची मोठी संख्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाची भूमिका ही आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स ई ची आहे त्यानंतर संक्रमण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असलेल्या पोलीस बांधवांचे योगदान आहे या दोघांच्या सोबत आपल्या पत्रकार बांधवांचे योगदान ही तितकेच महत्त्वाचे आहे कारण ते रस्त्यावर उतरून बातम्या करीत अफवा पसरू नये यासाठी प्रत्येक वेळी काळजी घेत आहेत याचसोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य आणि इतर प्रशासन कुठे कमी पडत आहे का यावर लक्ष ठेऊन शासन तसेच संबंधित प्रशासनाला सतर्क करीत आहेत.
राज्यात आरोग्य सेवा देत असताना डॉक्टर, पोलीस यांच्यासोबत च एकट्या मुंबईत 53 पत्रकार बांधवाना कोरोनाची लागण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार बांधवांची काळजी म्हणून नळदुर्ग शहरातील पत्रकार बांधवांना व पेपर विक्रेत्यांना मोफत 2 मास्क, सॅनिटायझर आणि डेटॉल हॅन्डवॉश देण्यात आले आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, सोशल मीडिया प्रमुख सूरज आवटे, मयूर महाबोले, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

 
Top