कळंब / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील दयानंद बळीराम पाटील यांनी स्वतःच्या शेतातील ज्वारी येथील शिवपुर वस्तीवर लोकांना आज दि. ७एप्रिल रोजी वाटप करण्यात आली.
सद्यस्थितीत कोरोणा व्हायरसने जगभरात धुमाकुळ घातला असल्याने त्याची काळजी घेण्याकरिता लाँक डाऊन परिस्थिती असल्यामुळे अनेक मजुरांना रोजगार नसल्याने अनेक दिवसांपासून या वस्तीवरील नागरीक आपल्या घरातच बसुन आहेत त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला नसल्याने दररोज खाण्याकरीता उपासमार होऊ लागल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य दयानंद बळीराम पाटील यांनी स्वतःच्या शेतातील १०पोती ज्वारी येथील नागरीकांना मदत म्हणून देण्यात आली. या वेळी एका कुटुंबाला किमान ७ किलो प्रमाणे १०क्विंटल ज्वारी वाटप करण्यात आली. या वेळी रवी मंडाळे, नामदेव मिसाळ,विकास बंडगर हे यावेळी उपस्थित होते.
 
Top