उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेचि जाणावा ॥२॥
या संत तुकाराम महाराजांच्या या अंभगाच्या ओवी प्रमाणे बेंबळी येथील दक्षता समितीच्या वतीने  जे रंजले-गांजले गरजूवंत आहेत आशांना दानशूर व्यक्तींच्या मदतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. प्रारंभी औपचारीक स्वरूपात ४०० किट वाटण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या हस्ते  करण्यात आला. समितीने जवळपास एक लाख २० हजारांचे किट्स लोकवर्गनीतून उपलब्ध केले आहे. त्याचे वितरण टप्या-टप्यात होत आहे.
या कार्यक्रमास बेंबळीचे सहायक पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. गेले आठ दिवस घरोघरी सर्वेक्षण करून ४०० लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी बेंबळी दक्षता समितीच्या मदतीने समितीतील दानशूर व्यक्ती, नोकरदार, व्यावसायिकांनी या उपक्रमास हातभार लावला आहे. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप आले असून. पहिल्या दिवशी जवळपास ७० गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यात साखर, तूर व मसूर डाळ, साबण, चहापत्ती आदी ११ प्रकारचे साहित्य या किटमध्ये समाविष्ट आहे.  लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे पालन होण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उर्वरित लाभार्थ्यांना दक्षता समितीकडून वेगवेगळी तारीख आणि वेळ नमूद असलेले कुपन दिले जात आहेत. त्यामुळे वाटप सुरळीत होत आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी चांगल्या उपक्रमास पोलिस प्रशासनही सहकार्य करेल असे सांगितले. यावेळी दक्षता समितीचे दिनेश हेड्डा, गालिबखान पठाण, सुनिल वेदपाठक, अमर कटके, शितलकुमार शिंदे, नितीन खापरे पाटील, गोविंद पाटील, आमोल गाडे, दिनेश हेड्डा, श्रीकृष्ण खापरे पाटील, इरफान जमादार, नंदकुमार मानाळे, शाम पाटील, रणजीत बर्डे, सचिन व्हनसनाळे, विद्याताई माने, बालाजी माने, अतीक सय्यद, गुड्डू सोनटक्के, सिध्दनाथ रेडेकर  आदी सदस्य उपस्थित होते.
 
Top