तुळजापूर / प्रतिनिधी-
 तालुक्यातील मसला खुर्द येथील  अंबरजना राजेंद्र कुंभार या शेतकरी महिलेने कोरोनाग्रस्तांनसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश सोमवार दि. 20 तहसिलदार सौदागर तांदळे यांच्याकडे पती राजेंद्र कुंभार, पञकार सघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या उपस्थितीत सपूर्द केला.
अंबरजना राजेंद्र कुंभार याच्या पतीचे तुळजापूर येथे शेतीस लागणाऱ्या मोटार साहित्य विक्री व दुरुस्ती  चे विमल मशनिरी स्टोअर्स नावाचे दुकान आहे. सदरील गरीब दांम्पत्य संत गोराबा काका पुण्यतिथीनिमित्ताने अन्नदान,  किर्तनाचा कार्यक्रम घेतात परंतु यंदा हा कार्यक्रम रद्द करुन यावर होणारा खर्च कोरोनाग्रस्तांसाठी देवुन अनोखी माणुसकिचे दर्शन या संकट काळात घडवले.

 
Top