उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी, केशेगांव येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर कारवाई करत बेंबळी पोलिसांनी एकुण १९ हजार १३० रुपयाचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.  ही कारवाई दि. २२ एप्रील  रोजी करण्यात आली.
पोलिस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार, बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख यांना बेंबळी व केशेगांव शिवारात तिरट नावाचा जुआ खेळविला जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर शेख यांनी जुआ अड्डयावर कारवाई करण्यासाठी   पथक पाठविले होते. या पथकाने   बेंबळी येथील महेश साखरे यांच्या शेतात तिरट नावाचा जुगार खेळत असताना संतोष हिंडोळे, महेश साखरे, महेश ढोणे (रा.बेंबळी) यांच्या विरूध्द कारवाई केली. यावेळी जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम ५,०५० रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केल. तर केशेगांव येथील रमेश मंत्री यांच्या शेतात तिरट नावाचा जुगार खेळत असताना गणेश कोळगे, विक्रम खंडागळे, युनूस शेख, आनंता माळी, गणपत कोळगे (सर्व रा. केशेगांव ) विरूध्द  पोलिसांनी कारवाई करत रोख रक्कम १४,०८० रुपयासह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या दोन्ही कारवाईत एकुण  १९ हजार १३० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वरील सर्व आरोपीविरूध्द गुन्हे दाखील करण्यात आले आहेत. या प्रकरणी  पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 
Top