उस्मानाबाद प्रतिनिधी-
कोरोना वायरसमुळे जगात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे, अशा परिस्थितीत आडचणीत सापडलेल्या लोकांना रूपामाता उद्योग समूह गेल्या महिनाभरापासून मदत करीत आहे. कोणताही सार्वजनिक उपक्रम राबविताना त्यात सातत्य असणे महत्वाचे आहे, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी व्यक्त केले.
कोरोना वायरसच्या लॉकडाऊनमुळे उस्मानाबाद शहर व परिसरात शिक्षणासाठी आलेले दुसऱ्या राज्यातील अनेक विद्यार्थी अडकून पडलेले आहेत. शिंगोली येथील आश्रम शाळेत तेलंगना, कर्नाटक, आंध्र येथील विद्यार्थी तर गाजी मैदानाजवळील दारूल उलूम शमशीया या शाळेतपण बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यातील मुले आहेत. तर शहरातील सांजा रोडवरील बहुरूपी, भटक्या लोकांना भोजन देण्याचे काम रूपामाता उद्योग परिवाराच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून चालू आहे. रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले की, लॉकडाऊन झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की, बऱ्याच लोकांची उपासमार होत आहे, २४ मार्च पासून हातावरील पोट असणाऱ्या लोकांना भोजन वाटपाचे काम सुरू केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिंगोली आश्रम शाळा, दारूल उलूम शमशीया या शाळेतील विद्यार्थीसाठी भोजन देण्यास सांगितले. गेल्या महिनाभरापासून आमचा हा उपक्रम चालू असून भविष्यात अडचणीच्या काळात कायम राहील, असे सांगितले.
यावेळी रूपामाताचे संचालक राजाभाऊ वैद्य, शाळेचे मौ. मोहमंद जाफर अली खान, ॲड.अजित गुंड ,मिलींद खांडेकर, संजय भिसे, गुरूदत्त लोंढे आदी उपस्थित होते.

 
Top