उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला असून कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता ४ वर गेली असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या आकडेवारीत उस्मानाबाद जिल्ह्यात चौथा रुग्ण सापडल्याचे नमूद केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना बाधित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ४१ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यात बलसुर येथील २९ तर धानोरी येथील १२ जणांचा समावेश आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर २१२ स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातील १५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हयात ११ ठिकाणी रुग्णांना निगराणीखाली ठेवण्याची व्यवस्था केली असून ११६ जण क्वारेंटाईन आहेत तर४ हजार ४४८ जणांना घरातच क्वारेंटाईन केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी रुग्णालये सज्ज आहेत.राज्यात आज ११३ कोरोना रुग्ण समोर आले असून बाधितांची संख्या ७४८ वर गेली आहे तर कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. उमरगा शहरात सापडलेला रुग्ण देखील दिल्ली येथून आलेला आहे तो मरकस येथे गेला होता त्यानंतर तो पानिपत येथे गेला. तो मॅकेनिक असून पुणे येथे राहतो मात्र दिल्ली येथून तो पुणे येथे आला व नंतर उमरगा शहरात आल्याची माहिती आहे. धानोरीत सापडलेला कोरोनाचा रुग्ण हा मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता त्याचा २० मार्चला हॉटेल मधील एका व्यक्तीशी रूम साफ करताना एका ग्राहकाशी थेट संपर्क आला त्यानंतर या रुग्णात २७ मार्चला कोरोनाची लक्षणे सापडल्यानंतर त्याच्यासह अन्य कर्मचारी याचे स्वब २९ मार्चला घेण्यात आले. त्यानंतर तो येनेगुर पर्यंत भाजीपाला गाडीत प्रवास करीत आला व त्यांनतर दुधाच्या वाहनात बसून गावी ३१ मार्च आला व या रुग्णाचा रिपोर्ट २ एप्रिल रोजी मुंबई येथे प्राप्त झाल्यावर त्याला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. उमरगा तालुक्यातील बलसुर येथे सापडलेला रुग्ण हा दिल्ली व पानिपत येथे फिरायला गेला होता व तो 4 दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता, त्यांनतर त्याचे स्वब नमुने घेतले होते त्यातील त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलं आहे.
प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज 
उमरगा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात केवळ कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येणार असून अन्य आजारावरील उपचार बंद करण्यात आले आहेत त्याच बरोबर उमरगा तालुक्यातील सर्व खासगी रुग्णालये व दवाखाने जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय आणीबाणीची स्थिती म्हणून त्यांच्या ताब्यात घेण्याचे आदेश काढले आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील तिन्ही रुग्णावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याने कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचार इतर रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून बंद केले आहेत तर उमरगा तालुक्यातील सर्व दवाखाने, वैद्यकीय उपकरणे, ऍम्ब्युलन्स डॉक्टर व कमर्चारी यांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्या नंतर जिल्ह्यातील ३ रुग्णालये हे कोरोना उपचारासाठी सज्ज करण्यात आली असून २०० बेडची व्यवस्था यात करण्यात अली आहे तर इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत
 
Top