तुळजापूर /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी  दिलेल्या आदेशानुसार शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यु आहे . या पार्श्वभूमीवर अामदार राणाजगितसिंह   पाटील  यांच्या संकल्पनेतून  सुरु करण्यात आलेल्या अन्नछञातील चारशे गरजूवंताना घरपोच भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तुळजापूर शहरातील गरवंताना घरपोच भोजन देण्यासाठी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोंद गंगणे, आनंद कंदले हे स्वत: परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत सुमारे चार हजार बेघर, गरजु लोकांना व पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांना भोजन देण्यात आले. ह्या उपक्रमासाठी नगरसेवक नागेश नाईक , नगरसेवक पंडीतराव जगदाळे, अभिजीत कदम, संतोष पवार,  शहाजी जाधव,  श्री. गणेश , श्री.रोचकरी,भरत सोनवणे, प्रमोद परमेश्वर,सोन्या भिंगारे, श्रीनाथ शिंदे,श्री महेश गुंड, हनुमंत पुजारी, समाधान जगताप परिश्रम घेत आहेत.
 
Top