तेर/ प्रतिनीधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दानशूर व्यक्तीच्या सहकाऱ्याने व ग्रामसेवा संघाच्या वतीने  कोरणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे  सुरू असलेल्या  संचार बंदीच्या काळात  गरीब, गरजू लोकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे उपासमारीची वेळ  येऊ नये . या परिस्थितीचा विचार करून  ग्राम सेवा संघाच्यावतीने दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने तेरमधील गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्याचा शुभारंभ.  30 मार्चला करण्यात आला .
यामध्ये पाच किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ, एक किलो साखर, अर्धा किलो शेंगदाणे , तूर डाळ, हरभरा दाळ प्रति अर्धा किलो, अर्धा किलो मीठ ,तिखट, जिरे, मोहरी, हळद ,चहा पत्ती प्रति 50 ग्रॅम, गोड तेल एक किलो, 1 अंगाचे साबन याप्रमाणे तेरमध्ये 30 मार्चपासून गरजूंना  जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्यात येत आहे. जीवनावश्यक साहित्याचे वाटप निराधार,गरीबांना होत असल्याने नागरीकामध्ये या अभिनव उपक्रमाचे कौतुक  करण्यात येत आहे.  या उपक्रमामध्ये ग्रामसेवा संघाचे पदाधिकारी,सहकारी या साठी परीश्रम घेत आहेत.
 
Top