उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 महाराष्ट्र शासनाने कोविड-19 उपायोजना नियम 2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणूमुळे (COVID-19) उद्वलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
ज्याअथी  उपरोक्त वाचा क्र.3 चे या कार्यालयाचे आदेशान्वये करोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, खाजगी शिकवण्या,  कोचिंग, अंगणवाडया तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, निवासी विद्यार्थी वसतिगृहे असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील  सर्व  मोठया शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा तसेच उस्मानाबाद जिल्हयातील  सर्व  क्रीडा संकुले दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. भारत सरकारने दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण भारत देशभर लॉकडाऊनचे आदेश पारित केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस, अंगणवाडया तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, निवासी विद्यार्थी वसतिगृहे असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील सर्व मोठया शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, उस्मानाबाद जिल्हयातील सर्व क्रीडा संकुले दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.  या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ लागू करण्यात येत आहे.
 
Top