उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 लॉकडाऊन मुळे उस्मानाबाद शहरातील हातावर पोट असणाऱ्या अनेक रोजंदारी कामगार, मजूर ,वेटर, घर काम करणाऱ्या महिला अशा अनेकांची उपासमार होत आहे. आशा सर्वांना मदतीची गरज आहे अशी विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ- मुंडे यांच्याकडे करून त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतीत सकारात्मक विचार करून अशा गरजवंत नागरिकांना मदत करण्यासंदर्भात महत्वाचे पाऊल उचलले. तसेच शहरातील दानशूर व्यक्तींनी अशा मदतीसाठी पुढे यावे या वैयक्तिक आवाहनालाही अनेक दानशूर व्यक्तींनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा व दानशूर लोकांना केलेल्या आवाहनाचा परिणाम म्हणून  एका दिवसातच उस्मानाबाद शहरातील विविध भागातील तब्बल 105 गरजू कुटुंबाला मदतीचा हात देता आला. यावेळी गुटनेता युवराज नळे यंाची उपस्थिती होती.
 
Top