उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिक, विद्याथ्र्यांच्या सानिध्यात उत्साहात साजरा करण्यात आला.श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी व खेळाडूंची मोठी उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडू व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रम जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी तावरजखेडा गावचे मनसेचे सरपंच मुरली देशमुख, कोंड ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव वाघमारे , अॅड. संतोष तानवडे, विद्यार्थी सेनेचे नारायण साळुंखे, महादेव शिंदे व मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, खेळाडू व मनसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top