उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील येणेंगुर येथे शनिवारी दि 14 मार्च रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व बौद्ध धम्मगुरूंच्या  हस्ते जुन्या  भीमनगरीत  सकाळी  धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तद्नंतर ही धम्म परिषद संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ  विचारवंत प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे भूषविणार आहेत तर राजरत्नआंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे भन्ते पय्यानंद  लातूर,भन्ते नागसेन बोधी उदगीर,भन्ते सुमेधजी महाथेरो सोलापूर,भन्ते धम्मसार कराळी ,भन्ते नागसेन खरोसा यांची धम्मदेसना  होणार आहे. यांचा बौद्ध बांधवांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन  धम्म परिषदचे स्वागताध्यक्ष प्रा. शरद गायकवाड  व  संयोजन समितीच्या  वतीने करण्यात आले आहे.

 
Top