उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे दि 8 मार्च रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत एकमुखाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष, तथा जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीत  युवक जिल्हाध्यक्षपदी  अमोल   पेठे  तर  फादर बॉडी मधील जिल्हा कार्याध्यक्षपदी स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश संघटक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा सचिव बबनराव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. याच बरोबर दत्ता  चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष, विकास जाधव  जिल्हा संघटक, अनिल शेळके कळंब तालुकाध्यक्ष, राघवेंद्र चाबुकस्वार युवक तालुकाध्यक्ष तुळजापूर, अक्षय राऊत युवक शहराध्यक्ष तुळजापूर, जितेंद्र माने तालुका सचिव तुळजापूर, नवनाथ जाधव  युवक उपाध्यक्ष, अजित बनसोडे  उप शहराध्यक्ष तुळजापूर,आश्रुबा मुंडे - शहर अध्यक्ष उस्मानाबाद, चंद्रकांत धूर्वे - तालुका उपाध्यक्ष उस्मानाबाद या सर्वांच्या निवड राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप  पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते करण्यात आल्या.
याप्रसंगी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बापूराव ढगे ,महाराष्ट्र जनरल सेके्रटरी सतीश लोंढे, अपंग विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत, गणीभाई मुलानी, हमीद भाई पठाण, गवळी ताई ,अब्दुल भाई सय्यद, बबलू राऊत इत्यादी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी तसेच रवी कोरे आळणीकर, अॅड गणपती कांबळे,   पांडुरंग लाटे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन  बबनराव वाघमारे  यांनी केले  व आभार प्रदर्शन काशिनाथ शिंदे यांनी केले.

 
Top