लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तहसील कार्यालयातील पेशकार बालाजी चामे यांनी दि.16 मार्च रोजी लातुर ते लोहारा 72 कि.मि. चा प्रवास सायकलवरुन 4 तासात करुन तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी सर्व शासकीय कर्मचा-यांनी सायकलवरुन ड्युटीवर यावे, असे परिपत्रक काढुन याची अंमलबजावणी दि.10 फेब्रुवारी पासुन करण्यात यावी, असे आदेश काढले होते. याअनुंषगाने पेशकार बालाजी यांनी लातुर ते लोहारा सायकवरुन प्रवास केला.
त्यानंतर पेशकार बालाजी चामे यांचा तहसीलदार विजय अवधाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, भागवत गायकवाड, विद्यासागर कोळी, अदि, उपस्थित होते. व तसेच नगरपंचायतच्यावतीने दिपक मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक आरीफ खानापुरे, हारी लोखंडे, आदी उपस्थित होते.
 
Top