
भूम शहरातील न.प. मध्ये कोरोना आजारा विषयी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच खबरदारीयाचा उपाय म्हणून भूम शहरात दर गुरूवारी होणारा आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. नगर परिषदेच्या वतीने या आजारास रोखण्यासाठी विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाने सुचविल्या प्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहन भूम नगर परिषद तर्फ मुख्याधिकारी मनीषा वडेपिल्ले यांच्या वतीने करण्यात आले आहे.