उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्या संदर्भात उमरगा तालुका तेली समाज सेवाभावी संघटनेची बैठक दि 29 फेब्रुवारी दु.2 वा. उमरगा येथिल श्रीराम मंगल कार्यालय येथे  झाली.
 ही बैठक जिलाध्यक्ष रवि कोरे आळणीकर , जिल्हा उपाध्यक्ष  राजाभाऊ घोडके , जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगलेआप्पा, अध्यक्ष संतोष  कलशेट्टी याच्या उपस्थितीत झाली. यावेळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावचे  दि.19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष रवि कोरे  यांनी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर उमरगा तालुक्यातील पदाधिकारी यांच्याकडे वधू-वर नोंदणी फाँर्म गुंजोटी, खसगी, कदेर, औराद, चिंचोली भु.)जकेकूर, जकेकुरवाडी, येळी,रामपूर, सुंदरवाडी,भुसणी, मुरूम, कंटेकुर, बेळंब, केसरजवळगा,खंडाळा, तडोळा, जामगा, अचलेर आलुर, कोथळी, येणेगूर, दाळींब, उमरगा तुरोरी, मुळज, गुगळगाव, त्रिकोळी, तलमोड, चिट्टा, बेडगा, डिग्गी आदीं गावांना वाटप करण्यासाठी देण्यात आले.
बैठकीस उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी, राजकुमार अंबुसे, कार्याध्यक्ष सिध्देश्वर  कलशेट्टी, बसवराज कलशेट्टी, शिवकुमार दळवी,सचिव शिवानंद साखरे, परमेश्वर साखरे, राजेंद्र घोडके , खंडू म्हेत्रे सर, प्रा.डाँ.सुर्यकांत रेवते ,उमरगा शहर संघटनेचे अध्यक्ष  धनराज कलशेट्टी, गुंजोटी तेली समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन टोंपे, उपाध्यक्ष बाळू साखरे, बाबुराव कलशेट्टी मल्लिनाथ दिक्षिवंत, सिद्राम दिक्षिवंतसाहेब, वैजिनाथ कलशेट्टी, प्रकाश दिक्षिवंत, संतोष साखरे,बसवराज म्हेत्रे, सचीन अंबुसे, चंद्रशेखर अंबुसे, किशोर साखरे, विजयकुमार घोडके, स्वस्तिक कलशेट्टी, सुनिल घोडके, कल्लप्पा साखरे, शिवराज साखरे, रामचंद्र घोडके आदि समाज बांधव उपस्थित होते.  वैजिनाथ कलशेट्टी यांनी आभार  मानले.  
 
Top