उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील हुतात्मा मंगल कार्यालय येथे दि. 1 मार्च 2020 रोजी ( अणदूर ता. तुळजापूर) बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत असलेल्या अभय केंद्र, तुळजापूरचे संरक्षण अधिकारी दिनेश घुगे यांना तहसिलदार सौदागर तांदळे यांच्याकडून मिळाली.
जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी. एच. निपाणीकर यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. घुगे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन हा बालविवाह थांबविला व अल्पवयीन बालिकेचे,कुटुंबाचे समुपदेशन केले. वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही,असे हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले.
या कामी त्यांना अणदूरचे तलाठी व्ही. व्ही कोल्हे, पोलिस पाटील श्री. जावेद शेख, नळदूर्ग पोलीस कॉन्स्टेबल श्री. मु. एल. मालाले व श्री.आर. एस. तरकसे, मल्लिनाथ मुळे, नितीन कांबळे.  नागिनी सदाफुले, उलण कस्तुरे, श्रीमती बेडे, श्रीमती व्होड्राव, श्रीमती घोडके, चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

 
Top