तेर/प्रतिधीनी-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री.संत गोरोबा काका व शिव मंदीर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर कोरोना व्हायरस या संसर्गजन आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनातर्फे "गर्दी "तसेच "जमावबंदी" याबाबत आदेश झालेले आहेत.त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.संत गोरोबा काका व शिव मंदीर 19 मार्च पासून पुढील आदेश होईपर्यत दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.भाविकानी याची नोंद घ्यावी व सहकार्य करण्याचे आवाहन श्री.संत गोरोबा काका व शिव मंदीर ट्रस्टचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर यानी केले आहे.

 
Top