कळंब /प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील परिवहन महामंडळाचे वाहक विश्वनाथ गव्हाळे यांनी  मुंबईतून आलेल्या व्यक्तीचा लाखोंचा मुद्देमाल असलेली पर्स परत करून प्रामाणिकपणाच दर्शन घडवले.
कळंब बोरीवली या गाडीवर आपले कर्तव्य बजावून परत आल्यानंतर सहज गाडीत फेरफटका मारताना त्यांना ही पर्स आढळून आली. पर्स बघतल्यानंतर त्यात लाखो रुपयांचे दागिने दिसुन आले परंतु त्याचा दागिण्याचा कसलाही मोह न करता ही पर्स त्यांनी आगारात जमा केला.  मुंबईहून आपल्या गावी आलेल्या सुभाष शिंदे यांची ही बॅग असल्याची खातरजमा करून शिंदे यांना बॅग परत केली, आपली दागिन्यांनी भरलेली बॅग परत मिळाल्याने त्यांनी  कर्मचा-यांचे व महामंडळाचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

 
Top