उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील समर्थनगर भागातील मुस्लीम युवकांनी ऊर्सानिमित्त विद्यूत रोषनाई, डिजे आदीसाठी करण्यात येणारय़ा खर्चास फाटा देत वृक्षलागवड, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर यासारखे कार्यक्रम घेवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील गाजी शमशोद्दीन रहे याचा ऊर्स 8 मार्च पासून सुरु होणार होता. परंतू सध्याच्या कोरोनाच्या प्रसार होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा ऊर्स रद्द करण्यात आला आहे.
मात्र ऊर्स रद्द करण्यात आला असला तरी या युवकांनी विद्यूत रोषनाई, डीजे आदीसह इतर मनोरंन कार्यक्रमावर खर्च न करता  बुधवार, 11 मार्च रोजी समर्थ नगर येथे नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर तसेच ट्रिगार्डसह वृक्षांची लागवड केली. या रोगनिदान शिबीरात 227 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर रक्तदान शिबीरात 36 तरुणांनी रक्तदान केले. त्याच प्रमाणे ट्रिगार्डसह 30 वृक्षांची लागवड करण्यात आली. सह्याद्री ब्लॅड बँकेच्या वतीने या ठिकाणी रक्तसंकलन करण्यात आले.
या सर्व उपक्रमांसाठी शेख सईद, सय्यद फहाद, अशपाक शेख, शेख जैद, शोएब शेख, इरफान शेख, अजिज शेख, संकेत काकडे आदी तरुणांनी परिश्रम घेतले. तर या सामाजिक कार्यक्रमासाठी अॅड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर, अॅड. दुरुगकर, अस्लम शेख आदी मान्यवरांनी सहकार्य केले.

 
Top