उस्मानाबाद /प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे यांची निवड झाल्याबद्दल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अर्थात बानाई उस्मानाबाद शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांची बानाईच्या सदस्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ए. एच. कांबळे, महासचिव डी. एन. सूर्यवंशी, ई. टी. सूर्यवंशी, बी. एन. देसाई, व्ही. एन. गायकवाड, सुभाष नगदे आदी उपस्थित होते.
 
Top