
उमरगा शहराची सुपुत्री व लातूर येथे राजश्री शाहू महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या प्रा.ज्योती मशाळकर यांची राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांमध्ये संशोधन शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्यांना नामांकित शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली दोन महिने काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
या शिष्यवृत्तीसाठी प्रा.ज्योती मशाळकर यांच्यासोबतच तीन विद्याथ्र्यांची सुद्धा निवड झाली आहे. प्रा ज्योती मशाळकर यांची भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू येथे दोन महिण्यासाठी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरकडून व नागरिकांतून कौतुक केले जात आहे.प्रा.ज्योती मशाळकर या उमरगा पालिकेचे नगरसेवक महेश मशाळकर यांच्या लहान भगिनी आहेत.