

गेल्या कांही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्हयातील शेतकरी दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या नैसर्गीक आपत्तीमध्ये फसला आहे. त्यामुळे या शेतक-यांना आर्थिक आधार देण्याची निंतात गरज आहे. शिराढोण मध्ये राजेंद्र मुदडा यांच्या मोसंबी व केशर आंबा बागेची व शेतकरी पंडीत याचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजेंद्र मुंदडा यांनी ५० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगुन गारपीटीचा विमा आंबा व मोसबी बागेला मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे सरकारकडून बळीराजा चेतना अंतर्गत कोरोडो रूपए येतात, परंतू कांही योजनेत भ्रष्टाचार होत असल्यामुळे शेतक-यांपर्यंत हा आर्थिक लाभ पोहचत नाही, या संदर्भत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्तांची पहाणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीमती गाठाळ , कळंबच्या तहसीलदार श्रीमती लटपटे , तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, संबंधित अधिकारी वर्ग, जि.प.सदस्य बाळासाहेब जाधवर, पं.स.सदस्य राजेश्वर पाटील, सभापती संगीता वाघे, नामदेव माकुडे, हनुमंत कानडे, राजेंद्र वाघमारे, विष्णु काळे आदींसोबत गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तके कशासाठी
बळीराजा चेतना अभियान योजनेतंर्गत ६ कोटीच्यावर भ्रष्टाचार झाला आहे. शेत-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुस्तकांवर खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. ज्यावेळेस अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित पुस्तक एजन्सीने पुस्तकेच शेतक-यांना वितरीतच न केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संबंधित पुस्तक एजन्सींने पुस्तक वितरीत केल्याचे सांगून शेतक-यांचे आंगठे, घेतल्याचे दाखविले आहे, सदर प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. आर्थिक समस्यामुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे प्रशासनातील कांही अधिकारी शेतक-यांच्या नावावर आलेल्या पैशात भ्रष्टाचार करतो, यामुळे संताप व्यक्त केला जाता आहे.