उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर जिल्हयात बुधवार दि.११ मार्च २०२० पर्यंत ३७ हजार ७४८ लाभार्थी शेतक-यांच्या खात्यावर ३०९ कोटी २२ लाख रूपये जमा झाले आहेत.
जिल्हयात एकुण या योजनेतंर्गत ६८ हजार ६३८ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये ऑनलाईन झालेले खातेदार ६६ हजार २२६ आहेत. यापैकी ६१ हजार २५७ शेतक-यांची यादी प्रसिध्द झाली. ४८ हजार ५३० शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर आधार प्रामाणीकरन न केलेले  शेतकरी १२ हजार ७११ आहेत. ज्या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण करने चुकीचे झाले आहे, त्याची तात्काळ दुरूस्ती डीडीआर ऑफीस मध्ये केली जात आहे.
या योजनेतंर्गत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ५५ हजार सभासद लाभार्थी शेतकरी आहेत. तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ६ मार्चपर्यंतचे २६ हजार ८४९ लाभार्थी शेतकरी आहेत. तर मराठवाडा ग्रामीण बॅंकेचे १० हजार १०४ शेतकरी लाभार्थी आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्राचे ११ हजार ८४२ लाभार्थी शेतकरी आहेत. जिल्हयातील एकुण २२ बॅंकांनी शेतक-यांना कर्जपुरवठा केला आहे. यापैकी सगळ्यात जास्त उस्मानाबाद जिल्हा बॅंकेने कर्ज पुरवठा केला आहे.
एकुण ७०० कोटींचा लाभ मिळेल
उस्मानाबाद जिल्हयात लाभार्थी शेतक-यांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असून ज्यांचे आधार प्रमाणीकरन झालेले नाही, अथवा चुकीचे झाले आहे, त्यांचे तात्काळ दुरूस्ती केली जात आहे. जिल्हयातील शेतक-यांना एकुण ७०० कोटी रूपयाची कर्जमुक्ती मिळेल, अशी माहिती डीडीआर विश्वास देशमुख यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
 
Top