उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संसर्गजन्य आजार कोरोनाचा प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने जिल्ह्यातील पानटपरी या बंद ठेवण्याचा मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचा आदेश झाला आहे. असे असतांनाही दि. 18 मार्च रोजी हा मनाई आदेश झुगारुन अंकुश राम सितापे, गणेश किसन बसवेकर, आयुब इमाम शेख, प्रमोद शिवाजी टकले सर्व रा. भुम यांनी भुम येथील चार वेगवेगळ्या ठिकाणी, गुनाजी रतन तेलंग रा. कळंब यांनी तांदुळवाडी शिवारात तर सागर धर्मराज कचरे रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी येडशी येथे, शारेख शमशाद काझी, अरफात अहमद शेख दोघे रा. उस्मानाबाद या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ताब्यात असलेल्या पानटपऱ्या चालू ठेउन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188 अन्वये वरील सर्वांविरुध्द स्वतंत्र 8 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 18.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.