उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील  व्ही. जे . शिंदे महिला महाविद्यालय येथे एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा दि 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान संपन्न झाली. या कार्यशाळेचे महत्त्वाचे विषय होते मानवी विकासासाठी विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य याची भुमिका या विषयावर तीन सत्रांमध्ये कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळाचे प्रमुख उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख व कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. विश्वास आप्पा शिंदे , भाऊसाहेब उंबरे ,व प्रथम सत्रा मध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुयोग अमृतराव, दुतीय सत्र मध्ये प्रा. डॉ. नानासाहेब मनाळे , तृतीय सत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. के. पी हावळ व डॉक्टर एम के पाटील होते या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव शिंदे व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

 
Top