तुळजापूर /प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यांसाठी दि. सहा व सात मार्च रोजी टुळटेक फेस्टिवल 2020 चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक 6 व 7 मार्च रोजी टुल टेक फेस्टिवल 2020 आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपप्राचार्य प्रा. रवी मुदकणा ,टुळटेक समन्वयक प्रा. डॉ. धनंजय खुमणे, प्रा.संजय आखाडे,प्रा. दीपक पौळ,प्रा. समीर माने हे उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना प्राचार्य जगदे म्हणाले की, शुक्रवार दिनांक 6 रोजी याचे उद्घाटन मंदिर संस्थांनच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व सर्व विश्र्वस्त यांच्या हस्ते होणार आहे, असे सांगून अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व कौशल्य पूर्व विकास होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट ऐक्जीबिशन, लॅन गेमिंग, सर्किट डिबगींग ,प्रोग्रामिंग, रोबो रेस, कॅडवॉंर, पोस्टर प्रेझेंटशन, या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार दि.7 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे .
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या वतीने रोख 70 हजार रुपयांची विविध पारितोषक देण्यात येणार आहे. यासाठी 500 विद्यार्थी सहभाग नोंदवितील असा अंदाज आहे. संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. यावर्षी महाविद्यालयातील 120 विद्यार्थ्यांपैकी 47 विद्याथ्र्यांची कॅम्पस अंतर्गत निवड झाली आहे. विद्याथ्र्याना मार्गदर्शनासाठी तज्ञांचे वेळोवेळी व्याख्यान आयोजित केले जाते व याचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यापीठाच्या मानकांनुसार प्रयोगशाळा साहित्य खरेदी करून प्रयोगशाळा अद्यावत करण्यात आल्या आहेत तसेच मानकानुसार सर्व विभागातील विषयानुसार प्राध्यापकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत असे डॉ. जगदे यांनी सांगितले. प्रास्तावीक डॉ. धनंजय खुमणे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.रवी मुदकन्ना यांनी मानले
 
Top