तामलवाडी/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात मंगळवार दि. 17 रोजी रात्री  झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे येथील शेतकरी रविकिरण आनंदराव पाटील यांनी गट न. 31 व 83 मध्ये 3 एकर क्षेत्रात आर.के. द्राक्षबागेची लागवड केली होती होती. हाताच्या बोटावर सांभाळलेली व काढणीला आलेली  द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने रविकिरण पाटील यांच्या स्वप्नावर अक्षरक्ष: पाणी फिरले. अवकाळी पावसाने व वादळी वा-याने काढणीला आलेल्या द्राक्षांच्या मण्यावर पाणी पडून वजनामुळे तान तुटल्याने पाटील यांची तीन एकरांवरील जवळपास पन्नास टन द्राक्षबाग अक्षरक्ष: भुईसपाट झाली. त्यामुळे पाटील यांचे जवळपास चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे. पाण्याविना कसेबसे जगविलेल्या द्राक्षबागेचे नुकसान पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करित होते. कृषी सहाय्यक पाटील, तलाठी रविंद्र अंदाने यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला असून पंचनाम्यात चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आले आहे.
या सर्व नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने व  कृषी विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीचा  पंचनामा करून या कोलमडलेल्या शेतक-यास किमान नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.
 
Top