
तालुक्यातील नवजात मुलीं‘या स्वागतासाठी एकात्मिक बाल विकास विभागा‘या वतीने बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमा अंतर्गत अंगणवाडी सेविकांना बाल विकास प्रकल्प अधिकारी देवानंद वाघ यां‘या हस्ते मंगळवारी किट चे वाटप करण्यात आले.
तालुक्यात माडज, बलसूर,मुळज,तुरोरी, चिंचोली, गुंजोटी, नाईचाकूर हे सात बिट आहेत. त्यात 186 अंगणवाड्या करीता हे किट प्राप्त झालेत. 176 मोठया अंगणवाडी आहेत तर दहा मिनी अंगणवाड्या आहेत.मोठ्या अंगणवाडी साठी प्रत्येकी चार व मिनी अंगणवाडी करिता प्रत्येकी एक किट देण्यात आले.या वेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी देवानंद वाघ,पर्यवेक्षक एम.जी.कुलकर्णी, एस.एन.माने, एल.बी.राठोड, व्ही.आर.कांबळे, पी.एस.देशमुख, ए.एस.खसगीकर, आर.आर.सोनकांबळे, इब्राहिम आली यांची उपस्थिती होती.
नवजात बालकांना हे किट देण्यात येणार आहेत.गरोदर महिले‘या पहिल्या प्रसूती नंतर दोन महिन्या‘या आतील मुलीं‘या साठी हे किट दिले जातात.’या लाभार्थी गरोदर मातेची नाव नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली नाही पण अंगणवाडी केंद्रात नाव नोंदणी केलेली आहे, अशा लाभाथ्र्याना अंगणवाडी सेविके मार्फत व एएनएम (नर्स) यां‘या मदतीने हे बेबी केअर किट देण्यात येते.