वाशी /प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील पारगाव येथे शिवसेनेचे उपनेते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा भूम-परंडा-वाशी चे विद्यमान आमदार तानाजीराव सावंत  यांचा वाढदिवस 15 मार्च  रोजी आहे. या वाढदिवसानिमित्त  शुक्रवार दिनांक 06 मार्च  रोजी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सुश्राव्य अशा किर्तनाचे आयोजन संध्याकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये  पारगाव येथे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. तरी वाशी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचे वाशी उपतालुकाप्रमुख विकास तळेकर तसेच शिवसेनेच्या वाशीच्या पंचायत समिती सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top