तुळजापूर/प्रतिनिधी-
धनगर समाजातील विद्याथ्र्याना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक गट व पदांच्या भरती प्रक्रियेत जागा वाटपा संदर्भात 23 जागा मिळायला हव्यात, त्यामध्ये फक्त एनटी क व एनटी ड प्रवर्गातील विद्याथ्र्यांना दोन जागा देऊ करून धनगर समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी व सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी अन्यथा समाज पूर्णत: रोडवर उतरेल असा इशार  निवेदनाद्वारे तुळजापूर तालुक्यातील धनगर समाजातील नागरिकांनी तहसीलदारांना दिला आहे.
यावेळी संजय घोडके, प्रशांत गावडे, सुरेश कोकरे, श्रीकांत कोकरे, मनोहर माने, सुनील खटके, महादेव सोनटक्के, राजेंद्र कलकुटगे, महेश बर्वे आदींची उपस्थिती होती.

 
Top