भूम/प्रतिनिधी-
शहरातील शासकीय विश्रामगृह भूम येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेची बैठक 15 मार्च रोजी पार पडली . या बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले . त्यानंतर पदाधिका-यांची निवड करण्यात आली.  यामध्ये महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल गोरख शेळके यांची निवड करण्यात आली. तर महिला जिल्हाध्यक्षपदी मंगल कुंडलिक शिंदे , युवती जिल्हाध्यक्षपदी अंधारे वैष्णवी बाळासाहेब ,परंडा तालुका अध्यक्षपदी तानाजी घोडके,  उपाध्यक्षपदी गवारे गोकुळ , कोषाध्यक्षपदी हंबीरराव मुळे, सचिवपदी पांडुरंग मिसाळ , भूम तालुकाध्यक्षपदी याशिन बादेला, तालुका उपाध्यक्षपदी आनंदराव साळुंखे, भूम शहराध्यक्षपदी राहुल शेंडगे, वाशी तालुकाध्यक्षपदी प्रवीण डोके (पारगांव), उपाध्यक्षपदी सयाजी मोळवणे यांची निवड करण्यात आली तसेच संघटनेच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आल.
या कार्यक्रमास  छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री धनंजय वळेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप नरहरि डोके,  संस्थेचे सचिव रियाज पठाण, संस्थेचे विविध पदाधिकारी, कार्यकत्र्यांची उपस्थित होती.
 
Top