तुळजापूर/प्रतिनिधी -
शहरातील  शुक्रवार पेठ भागातील मटण विक्री दुकाने हटविण्याची मागणी झाली होती, त्यानंतर हे दुकाने हटविण्याची कार्यवाही झाल्यानंतर हे दुकाने याच जागी कायम ठेवावेत ते हलवु नयेत अशी मागणी निवेदनद्वारे याच भागातील रहिवाशांनी न.प.प्रशासनाकडे केली आहे.
काही दिवसापुर्वी रस्त्यावर असणारे मटण विक्री दुकाने हलवुन ते आठवडा बाजार येथे नेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर  कार्यवाही सुरु असतानाच याच भागातील मंडळीनी हे दुकाने शंभर वर्षापासुन येथे असुन या भागातील मंडळी साठी सोयीचे असल्याने ते हटवु नयेत अशा मागणी चे निवेदन नगर परिषद प्रशासन दिले आहे. निवेदनावर मालोजी नाईकवाडी,  रोहीत राऊत,  प्रा. दादासाहेब जाधव, ऋषीकेश सांळुके, परिक्षीत सांळुके, सर्वेश खुरुद, आकाश वालेसह शेकडो लोकांच्या सह्या आहेत.

 
Top