तुळजापुर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर कोरोना या साथीच्या रोगा मुळे दि.17 मंगळवार पासुन बंद राहणार आहे तरी श्री तुळजा भवानी मातेच्या देवी भक्तांना विनंती आहे की आपण तिर्थ क्षेत्र  तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी येऊ नये तसेच आपण घरी बसुनच श्री देवीच्या  लाव्हीव दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान च्या वतीने दि.16  सोमवार रोजी आयोजित पञकार परिषदेत करण्यात आले.
संपुर्ण भारतासह, संपुर्ण महाराष्ट्रात कोराना व्हायरस पसरत असल्यामुळे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानच्या वतीने कोरोना व्हायरस पसरत असल्यामुळे श्री देवी भक्तांना व शहरातील नागरीकांना हाणी पोहंचूनये म्हणून तातडीने सोमवार रोजी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानच्या एक बैठक  घेण्यात आली. या बैठकीस श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान ट्रस्ट च्या तहसीलदार योगिता कोल्हे तहसीलदार सौदागर तांदळे धार्मिक  व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले नगराध्यक्ष सचिन रोचकरी, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर ,पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष  किशोर गंगणे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे  संचालक नागेश सांळुके, अजित क्षिरसागर,श्री तुळजा भवानी पक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, चरणतिर्थ मंडळाच्या अध्यक्षा सुचिञा वाघमारे, भोपे पुजारी मंडळाचे सदस्य  सोंजी, पाळीकर पुजारी इंद्रजीत सांळुके, दत्ता क्षिरसागर,  निलेश रोचकरी,  सचिन टोले, उपाध्ये मंडळाचे मकरंद प्रयाग,गिरीष देवळाकर आदीसह भोपे पुजारी,  पाळीकर पुजारी उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मातेस सकाळी व सायंकाळी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने  सर्व भक्तांच्या वतीने  एकच अभिषेक पुजा घालण्यात येणार आहे. तसेच श्री देवीचे दैनंदिन धार्मिक विधी दररोज करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर ज्या भाविकांनी आँनलाईन सिंहासन पुजा बुक केल्या होत्या त्या सिंहासन पुजा ही रद्द करण्यात आल्या आहेत. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज दिवसेन संख्या वाढत चालली असल्यामुळे महाराष्ट्र राज्य शसनाच्या व जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  दि.17 मार्च  ते 31 मार्च 2020 पर्यत महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करुन निर्णय घेण्यात आला आहे जो पर्यत महाराष्ट्र राज्य शासनाकडुन मंदीर उघडण्या बाबतीत जो पर्यत आदेश येत नाही तो पर्यत श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर बंद असणार आहे, असा खुलासाही देण्यात आला आहे. भाविक व शहरातील  नागरीकांच्या सुरेक्षेच्या दृष्टीकोनातुन हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दररोज धार्मिक विधी बाबतीत पाळीचे  श्री तुळजाभवानी भोपे पुजारी , श्री देविचे महंताना सेवेदारी व पाळीकर पुजारी अशा मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या पहाटे चरण तिर्थावेळी श्री देवीचे सेवेकरी चरण तिर्थास फक्त चार लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सायंकाळी प्रक्षाळ पुजा करण्यासाठी फक्त चार सेवेकरी लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
 श्री तुळजाभवानी मातेच्या राजे शहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार व छञपती शिवाजी दरवाजा या ठिकाणी कडक  सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस बाबतीत  श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी श्री देवी भक्तांना दर्शनासाठी येवु नये तसेच श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी येऊ नये म्हणून सांगावे  श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातील गाभा-यात फक्त ज्या पुजारी वर्गाची पाळी आहे. त्यानीच थांबावे अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत कोरोना व्हायरस पसार जास्त फैलावत असल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र राज्य शासनाच्या  व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय व इतर सांस्कृतिक कार्यक्रम ही बंद करण्यात येणार आहेत.
 
Top