उमरगा/प्रतिनिधी-
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने  तालुक्यातील कदेर येथे रविवारी दि .15 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ सात फुटी उंच पुतळयाचे अनावरन करण्यात आले. प्रारंभी  पदाधिका-यांच्या हस्ते पूजन करून पुतळयाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी सरपंच शरदाबाई आळगे, उपसरपंच सिधुताई पवार,जीप सदस्य शालिनीताई जीवणगे, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश जाधव,पोलीस पाटील सुनील पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी रेखाताई सूर्यवंशी, रेखाताई पवार, सुनंदाताई माने, मंजूषा चव्हाण, संभाजी ब्रिगेड, मराठा वारीयर्स, छावा मराठा संघटना, राजमुद्रा प्रतिष्ठान, किसान ब्रिगेड, मावळा प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान गावातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी पारंपारिक वाद्य वाजविण्यात आले. बाल गणेश लेझीम पथक ,सिंह गर्जना ठोल ताशा पथक, तुळजाभवानी सबळ पथकाच्या कलाकारांनी सहभाग घेतला होता.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य  प्रतिष्ठानचे पदाधिकारी अजित पाटील, विकास शिंदे, विशाल पवार, धीरज जाधव, संभाजी कलबर्गे, कपिल गायकवाड, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील मानेगोपाळे, नरेश भोसले, जयराम माने-गोपाळे, मनोज कलशेट्टी, सागर जाधव, भरत जाधव, जयदीप पाटील, धर्मराज जाधव आदींनी परिश्रम घेतले. सोहळ्यास जेष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील, संजय बिराजदार, माजी सरपंच संजय कलशेट्टी, बाळासाहेब गायकवाड, संदीप जाधव, सतीश औरादे, राजेंद्र उपळे, मनोज पाटील, नंदू जाधव आदींनी मार्गदर्शन केले.
 
Top