तुळजापूर/प्रतिनिधी-
शहरातील जवाहर गल्लीत सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात जवाहर महिला भजनी मंडळा‘या वतीने  आयोजीत रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकुण 50 महिला व पुरूषंनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ जीवनदान म्हणून सध्या वाढणारी रक्ताची गरज पाहुन जवाहर भजनी महिला मंडळा‘या महिलांनी रक्तदान शिबीर घेण्याचा निर्णय घेवुन सोमवार दि.16 रोजी रक्तदान शिबीर आयोजन केले. या शिबीरास महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. रक्तदान केलेल्या सर्व महिलाचे जवाहर महिला भजनी मंडळा‘या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

 
Top