उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना वायरसमुळे सर्वत्र संचार बंदी लागल्याने आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा या तीन राज्यातील विद्यार्थी उस्मानाबाद मध्ये अडकून पडले आहे. जिल्हा प्रशासनाने त्याची निवासाची सोय शिंगोली येथील विद्या निकेतन आश्रम शाळेत केली आहे. या विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी रूपामाता उद्योग समुहाकडे सोपविण्यात आली आहे.
रविवार दि. २९ पासून ते १४ एप्रिल २०२० पर्यंत रूपामाता उद्योग समुह ने मदतीचा हात पुढे केला आहे. रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष अॅड.व्यंकटराव गुंड, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, संचालक राजाभाऊ वैद्य, तलाठी गोकुळ शिंदे, अॅड.अजित गुंड, मिलींद खांडेकर, सरपंच यडबा शितोळे, सोमेवश्वर शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चपाती, मसाला भात, टमाटा चटणी फुल पॉकीट मध्ये वितरण करण्यात आले. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राठोड, गणेश खराडे, हर्षल मोहिते, गुरूदत्त लोंढे, संजय भिसे आदींने परिश्रम घेतले.