परंडा/प्रतिनिधा-
सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह यांचा 700 वा उरुस दि.4 रोजी बुधवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. उर्स निमित्त येथिल तहसिल कार्यालयातून मोठ्या उत्साहात संदल मिरवणुक काढण्यात आली. ऊर्स यात्रेला राज्यांच्या  कानाकोपऱ्यातून  हजारोच्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले होते. "हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन की चारो दीन  च्या जयजयकाराने परंडा शहर दुमदुमून निघाले.
बुधवारी उरूस संदल मिरवणुकीची सुरुवात येथिल तहसील कार्यालयातून करण्यात आली. सर्वधर्मीय मान्यवरांच्या उपस्थितीत फोतेहखानी कार्यक्रम पार पडल्यानतंर मानाची चादर परिवेक्षिकाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार विवेक जॉन्सन यांच्या डोक्यावर देण्यात आली. जॉन्सन यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, अॅड. नुरूद्दीन चौधरी यांच्या डोक्यावरील फुलांच्या चादरी  मानकरी घोडयावर चढवण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा परिषद गटनेते तथा जिल्हा परिषद पशुसंवर्धन-कृषी सभापती दत्ता साळुंके, नायब तहसीलदार डॉ.तुषार बोरकर, निवडणूक विभाग प्रमुख गणेश सुपे, नायब तहसीलदार पांडुरंग इनामदार, मुख्याधिकारी दिपक इंगोले, नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिरू सौदागर, पोलीस निरिक्षक सय्यद, उद्योजक भैरवनाथ शिंदे, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, शिवसेनेचे नेते सुभाषसिंह सद्दीवाल, रिपाईचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर, बब्बु जिनेरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाग्रोंडीकर, राहुल बनसोडे, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक रत्नकांत शिंदे, नसीर शहाबर्फीवाले,माजी उपनगराध्यक्ष शाम मोरे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मसरत काजी,  राष्ट्रवादी शहराध्यक्ष वाजिद दखनी,  फेडरेषणचे संचालक  हरिचंद्र मिस्कीन,जावेद पठाण, माजी नगरसेवक शब्बीरखाँ पठाण, मैनुद्दीन तुटके, भाजपा शहराध्यक्ष अॅड जहीर चौधरी, नदीम मुजावर, हाजी नय्युम मुजावर, प्राचार्य गोविंद जाधव, नवाबोद्दीन मुजावर, समीर पठाण, गणेश राशनकर, संजय महाराज पुजारी आदी उपस्थित होते.
तहसील कार्यालयात उरूस कमेटीच्या वतीने मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या चौधरी मानाच्या घोड्यावर ठरविण्यात आल्यानंतर येथील तहसील कार्यालयातून संदल मिरवणुकीला ढोल ताश्याच्या गजरात सुरुवात झाली. संदल मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी चौक मार्गे टिपू सुलतान चौकात पोहचताच संदल मिरवणुकीचे स्वागत नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी  स्वागत केले.  आजाद चौक येथे मंडळाचे अध्यक्ष आसीफ शेख, शरिफ तांबोळी यांच्या सह पदाधीका-़्यांच्या वतीने उर्सनिमित्त आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.   त्यानंतर संदल मिरवणुक विविध मार्गे सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह यांच्या दर्गाह येथे पोहचली. या ठिकाणी मानाच्या घोडयाने दर्गाहच्या पाय-या क्षणात पार करून हजरत खाँजा बद्रोदीन यांच्या समाधीसमोर उभे राहून सलामी दिली.
या वेळी दुतर्फा उभा राहिलेल्या भाविकांनी हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन की चारो दिन चा जयजयकार केला. हा क्षण पाहण्यासाठी दर्गाह येथे  मोठी गंर्दी उमडली होती. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. संदल मिरवणुकीमध्ये पुणे, बारामती, वैराग, बार्शी, करमाळा, पाटोदा येथिल बॅन्ड पथके सहभागी झाले होते. तर जामखेड, उस्मानाबाद, मुंबई येथिल ढोलीबाजा पथकांनी ढोल ताश्याच्या संगीत सादरीकरणातून शहरवाशीयांना मंत्रमुग्ध केले. तत्पुर्वी सकाळी 9 वाजता शहरातील बाडीवाले यांच्या वाडयावरुन ढोल ताश्याच्या गजरात सोनेरी कलशाची मिरवणुक काढण्यात आली होती. उर्सानिमित्त पोलीस निरिक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
Top