परंडा / प्रतिनिधी -
शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी दि.1फेब्रुवारी 2020 रोजी पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर प्रहार शिक्षक संघटनेने एक दिवसीय धरणे आंदोलन केले,यावेळी आंदोलन कर्ते शिक्षकांशी चर्चा करून मागण्यांची पुर्तता केल्याचे सांगून व लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याबाबत प्रहार शिक्षक संघटनेला लेखी पत्र दिले.
धरणे आंदोलनास एक महिना उलटूनही न्याय मागण्यांची सोडवणूक झालेली नाही;सातव्या वेतन आयोगतील फरकाची जीपीएफ मध्ये जमा होणा-या बीलाची एक प्रत मागणीनुसार  मिळालेली नाही.  सेवा जेष्ठतेनुसार जि.प्रा.शा.शेळगाव ता.परंडा या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा पदभार रघूनाथ दैन यांचेकडे द्यावा असा आदेश गटशिक्षणाधिकारी परंडा यांनी दिनांक 28 जानेवारी  2020 रोजी दिला परंतू माजी मुख्याध्यापक नागनाथ देशमुख यांनी आजतागायत लेखी चार्जपट्टी मुख्याध्यापक रघुनाथ दैन यांना दिलेली नाही.तसेच नागनाथ देशमुख यांचे कडील प्रभारी केंद्रप्रमुख पदाचा पदभार काढून घेणे बाबतचा अर्ज शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ दैन यांनी दि.15 फेब्रुवारी 2020रोजी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी परंडा यांना दिलेला असताना यावरही अजून कार्यवाही झालेली नाही.
केंद्रीय मुख्याध्यापक केंद्र तांदुळवाडी महादेव गाडे यांनी  वैजिनाथ सावंत यांना जीपीएफ मध्ये जमा होणा-या बीलाची प्रत दिलेली नाही. न्याय मागणीनुसार बीलाची एक प्रत न मिळालेस तसेच संबंधित केंद्रप्रमुख आणि केंद्रीय मुख्याध्यापक केंद्र तांदुळवाडी यांचा पदभार दि.13 मार्च 2020 पर्यंत काढून न घेतल्यास दिनांक 16 मार्च 2020 रोजी पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर गाजर वाटप आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दि.2 रोजी  गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले,परंडा तालुकाध्यक्ष विनोद सुरवसे,सचिव परशुराम लोहार, उपाध्यक्ष शहाजी झगडे,संघटक रमेश शिवणकर आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top