उमरगा/प्रतिनिधी-
 उमरगा पंचायत समितीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत सुजल व स्वच्छ गाव प्रशिक्षण सोमवारी दि 2 रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आले.तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पंचायत समितीच्या सदस्यां सुवर्णा भालेराव, अभय माने,हबीब जाफरी यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.गावा अंतर्गत नागरिकांना वर्षभर शुद्ध व सुरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे,ही ग्रामपंचायतीची मुख्य जबाबदारी आहे.या करिता लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतिच्या इतर लाभधारकाना त्याच्या जबाबदा-या समाजाव्यात गावात पुरेसा व शुद्ध पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुविधाची उपलब्धता निश्चित होण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.यात जळजीवन मिशन स्तोत्राचे बळकटीकरण पाणी पुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्ती पाण्याची गुणवत्ता शाश्वत सांडपाणी व्यवस्थापण,प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मैला गाळ व्यवस्थापण,सुजल व स्वच्छ गाव कृती आराखडा, जळजीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा,(व्ही. ए. पी. ) आदी विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हनुमंत गादगे,साधन व्यक्ती असिफ मुल्ला,शिवाजी गायकवाड, उपअभियंता प्रवीण पाटील,आदींनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश डुंमने,प्रकाश चव्हाण, नंदकुमार राठोड, एस.एस.शेटगार,निरंजन घुमे,एफ.एम.घटे, आदींनी परिश्रम घेतले.

 
Top