कळंब/प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांना रोटरी क्लब च्या वतीने उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल आदर्श पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.र
रोटरी क्लबच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या समारंभात आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील,उद्योजक बी बी ठोंबरे उपस्थीत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी झांबरे यांच्या कार्याची दखल घेत आदर्श पुरस्कार सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन दाम्पत्यीक सत्कार भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल झांबरे यांचे कौतुक,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
Top