उस्मानाबाद/प्रतिनिधी-
6 कोटी 25 लाख रूपये बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतक-यांना वाटप करण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या पुस्तक खरेदी अनियमितते प्रकरणी चौकशी समितीने एकूण 18 जणांना नोटीस काढून लेखी जबाब समक्ष हजर राहून सादर करण्यास बजावले होते. त्यानुसार बुधवारी 6 जणांनी आपले जबाब सादर केले असून निवासी उपजिल्हाधिका-यांनी आपला अहवाल यापूर्वीच सादर केला होता. यामध्ये पुस्तक खरेदी व वाटपाची कागदपत्रे चौकशी समितीच्या ताब्यात दिल्याचे कळते. परंतु, चौकशी समितीचे अध्यक्ष तथा जिपचे सीइओ डॉ. संजय कोलते हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी असल्याने पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन तहसीलदार अभय मस्के, राजकुमार माने, तत्कालीन उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपलेखापाल अनिल किणीकर, लिपिक प्रवीण साठे, अभिजीत देशपांडे या 6 जणांनी चौकशी समितीसमोर हजर राहत लेखी म्हणणे सादर केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी यापूर्वीच दि.2 मार्चला या बाबतचा गोपनीय अहवाल चौकशी समितीकडे सादर केला आहे. बळीराजा चेतना अभियानात पुस्तक खरेदी व वाटपाची संचिका जिल्हाधिकारी कार्यालयातून गायब झाली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन तहसीलदार अभय मस्के यांनी कागदपत्रांचे काही गठ्ठे चौकशी समितीकडे सुपूर्द केले आहेत. दरम्यान तपास करण्यासाठी 19 जणांना 4 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यापैकी सहाच अधिकारी-कर्मचारी हजर राहिले आहेत.